जुबिन नौटियाल च्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती आली समोर; ऐकून व्हाल थक्क…

जुबिन नौटियालला प्रसिद्ध गायक म्हणून सर्वत्र ओळखला जातो. अनेक चित्रपटांच्या गाण्याला जुबिनने त्याचा आवाज दिला आहे. त्याचे आवाजाचे अनेक चाहते आहेत. परंतु या गायकाची गंभीर बातमी समोर आली आहे.  (breaking news and new update about singer Jubin Nautiyal’s health)

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल याचा खूप गंभीर अपघात झाला आहे. ज्यामुळे त्याला तातडीने  रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जुबिन त्याच्या घरामधील पायऱ्यांवरुन  पडला आहे. त्यामुळे त्याला खूप गंभीर दुखापती झाल्या आहेत. या अपघातामध्ये जुबिनला हाताला, डोक्याला,आणि कपाळावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

त्यामुळे त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  इथं त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु माहिती नुसार या प्रसिद्ध गायकाला आता लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजलं आहे.

या संदर्भात जुबिनने पोस्ट करून सर्वाना माहिती कळवली आहे. रुग्णालयामधला त्याचा एक फोटो शेअर करत  डिस्चार्जबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. स्वतःचा फोटो पोस्ट करत त्याने लिहलं कि, ‘तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार. देवाचं माझ्यावर लक्ष होतं. त्यानेच मला जीवघेण्या  अपघातापासून वाचवलं आहे. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी लवकरच ठिक होईल.’

असा फोटो आणि कॅप्शन पोस्ट करत जुबीनने त्याच्या चाहत्यांना तो ठीक असल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या अपघाताच्या माहिती नंतर चिंता व्यक्त  करताना दिसत होते. तर काही चाहते त्याची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना करत होते.

गायक जुबिन नौटियाल याच्या आगामी शोमुळे काही दिवसांपूर्वी अनेकांनी राग व्यक्त केला होता. जुबिनच्या विरोधात अनेकांनी आरडाओरडा केला होता आणि त्याला अटक करा अश्या मागण्या करण्यास सुरवात केली होती. तर सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.

हा विरोध करण्याचे कारण की जुबिनच्या शोचे आयोजक एका गुन्हेगाराने केले असल्याचे समजले होते. त्यामुळे अनेक जण जुबिनबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होते. तर अनेक जण त्याला देशद्रोही असल्याचे म्हणत होते.

त्या गोष्टीवर जुबिन नाराजी प्रतिक्रिया देत म्हणाला होता कि, या सगळ्या वातावरणाचा फटका आपण अनेक वर्षांपासून करत असलेल्या मेहनतीला बसत आहे.

Leave a Comment