बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या गरोदर असल्याच्या चर्चांवर केला संताप व्यक्त; म्हणाली कि,…..

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत येत असते. या अभिनेत्रींच्या घटस्फोटनंतर हिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे. मात्र आता ही अभिनेत्री गूड न्यूज देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. (Bollywood actress Malaika Arora has expressed her anger over the rumors about her pregnancy)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बद्दल जोरदार चर्चा रंगत आहेत. वयाच्या  ४९व्या वर्षी या अभिनेत्रीने तिच्या पती अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर या अभिनेत्रींचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे. तर आता तिच्या गरोदर असल्याच्या बातम्या समजत आहेत. पिंकविलाने ही बातमी सांगितली आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार मलायका लवकरच अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार आहे.  त्यामुळे मलायका आणि अर्जुन बद्दल तुफान चर्चा रंगल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने या बातम्यांवर संताप व्यक्त केला होता. तर आता स्वतः  मलायका अरोरा या संदर्भात बोलली आहे.

मालयकाने देखील या वृत्तांवर संताप व्यक्त करत पिंकविला आणि त्यांच्या पत्रकारांना चांगलंच सुनवलं आहे. तर या संदर्भात अर्जुन कपूर काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायकाच्या गरोदर असल्याची बातमीचा फोटो पोस्ट करत राग व्यक्त केला होता.

त्यावेळी अर्जुनने लिहले कि, “अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका”.

मात्र आता अर्जुन कपूरची स्टोरी शेअर मलायकाने देखील संताप व्यक्त करत पिंकविला आणि त्यांच्या पत्रकारांना चांगलाच ऐकवलं आहे. त्यावेळी ती म्हणाली कि, “हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे”.

तर पिकविलाने त्यांच्या वृत्तामध्ये सांगितले होते कि, मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याचे बातमी स्वतःच्या त्यांच्या नातेवाईकांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या वृत्तावर मलायका आणि अर्जुनने संताप व्यक्त करत पत्रकारांना खूप सुनावलं आहे.

मलायका अरोराच्या घटस्फोटानंतर पासून अर्जुन कपूर आणि मलायका यांचे अफेयर चालू असल्याचे समजले होते. तर अनेक वर्षांपासून हे दोघे एकत्र आहेत. सोशल मेडीआयवर या दोघांबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. मध्यंतरी ये दोघे लग्न करणार आहेत अश्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Leave a Comment