अभिनेत्री हेमांगी कवीने व्हिडिओ पोस्ट करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; म्हणाली कि, द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी…

अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बेधडक बोलण्यासाठी सर्वत्र ओळखली जाते. मात्र तिच्या अश्या बोलण्यामुळे ती सतत वादात अडकत असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिला तिच्या टिकाकर्त्यांना सडेतोड उत्तर दिली आहे. (Actress Hemangi Kavi posted a video and gave a scathing reply to the trolls)

चित्रपट विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांचे ठाम मत मांडण्यासाठी ओळखले जातात. अश्याच कलाकारांमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीचे नाव येते. परंतु अशे कलाकार त्यांच्या बोलण्यामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या हिमांगी सुद्धा चर्चेत आली आहे. कारण तिने तिचा ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हिमांगी सतत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यासाठी ती सोशल मीडियावर सक्रिय राहते. ती तिचे अनेक फोटो व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तर तिच्या विनोदांवर अनेक नेटकरी पोट धरून असत असतात.

सोशल मीडियावर ट्रेंडींग असलेलं रिल हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बनवून पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये डाव्या आणि उजव्या बाजुला हिमांगीच दिसत आहे. या एका रीलमध्ये दोन व्हिडिओ दिसत आहेत. डाव्या आणि उजव्या बाजुच्या व्हिडीओला काही तर लिहलं आहे.

डाव्या बाजुच्या व्हिडीओला लिहलं आहे कि, ‘ही काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते.’ तर उजव्या बाजुच्या व्हिडीओला लिहलं आहे कि, ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते.’ हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु सध्या इंस्टाग्रामवर अश्या व्हिडिओचा ट्रेंड सुरू असल्यामुळे हिमांगीने हा व्हिडिओ केल्याचे समजत आहे.

इंस्टाग्रामवर हिमांगीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ पोस्ट करते तिने कॅप्शन लिहलं कि, “इंडस्ट्रीतील काही लोकांच्या, माझ्या कुटुंबातील काही लोकांच्या, काही खास मित्र मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, तसंच ट्रोलर्स आणि द्वेष करणाऱ्या सगळ्यांसाठी अलग से!. असे लिहत हिमांगीने हा व्हिडिओ शेअर कला आहे.

तसेच या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहेत. तर अनेक जण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट करत आहेत. तर अनेक हटके कमेंट या व्हिडिओ वर येत आहेत.

एकानी कमेंट केली आहे कि, ‘हे आवडलय ताई आहे तू काहीही करतेस पण एकटीच करतेस.’ तर दुसरा म्हणतोय कि, ‘जे करतेस ते भारी आहे, नावे ठेवण्यापेक्षा ते चांगले आहे.’ तिसरा नेटकरी म्हणतोय कि, तू हेच करत राहा, तू जे करते ते सर्वांना जमणाऱ्यातले नाही.’ तर चौथा म्हणतोय कि, हो तू काहीही करते परंतु उत्तम  करतेस.’ अश्या अनेक भन्नाट भन्नाट कमेंट हेमांगीच्या पोस्टवर आल्या आहेत.

Leave a Comment