प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; भयंकर अपघातात…

भारतात तसेच भारता बाहेर प्रसिद्धआणि उत्तम गायक म्हणून जुबिन नौटियालला (Jubin Nautiyal)  ओळखले जाते. त्याने त्याच्या गायनाने अनेकांच्या मानत घर केलं आहे. त्याच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. परंतु सध्या जुबिन बद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. (Famous singer Jubin Nautiyal met with a terrible accident)

या गायकाचा गंभीर अपघात झाला आहे. त्यामुळे त्याला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घरातील पायऱ्यांवरून पडून त्याचा गंभीर अपघात झाला आहे.  मात्र त्याला यामध्ये गंभीर दुखापत झाली आहे. हाताला, डोक्याला,आणि कपाळावर इजा झाल्या आहेत. त्यामुळे त्याला तातडीने  मुंबईच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले आहेत.

गेल्या गुरुवारी जुबिन आणि योहाना या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होत. परंतु त्याच्या गाण्याच्या लॉन्चनंतर त्याचा हा गंभीर अपघात झाला आहे. ज्यामध्ये जुबिनला खूप दुखापत देखील झाली आहे. त्यासाठी त्याला डॉक्टरांनी दात आणि हातची शस्त्रक्रिया करायला सांगितलं आहे.

जुबिनच्या अपघाताची बातमी समजतात त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्याचसोबत त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.

मध्यंतरी जुबिनच्या एका शोमुळे त्याचवर अनेक जण खूप संतापले होते. हा संताप इतका वाढला होता की अनेकांनी त्यला अटक करण्याची मागणी केली होती. तर सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal हा हॅशटॅग खूप व्हायरल झाला होता.

हा विरोध करण्याचे कारण की जुबिनच्या शोचे आयोजक एका गुन्हेगाराने केले असल्याचे समजले होते. त्यामुळे अनेक जण जुबिनबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होते. तर अनेक जण त्याला देशद्रोही असल्याचे म्हणत होते. त्या गोष्टीवर जुबिन नाराजी प्रतिक्रिया देत म्हणाला होता कि, या सगळ्या वातावरणाचा फटका आपण अनेक वर्षांपासून करत असलेल्या मेहनतीला बसत आहे.

Leave a Comment