अबब!! अभिनेता कमल सदानासोबत घडली खूप वाईट घटना; ‘त्या’ रात्री संपल अख्खं कुटुंब, ही घटना ऐकून बसले धक्का..

बॉलिवूड अभिनेता कमल सदाना अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. या अभेत्याचा खूप कमी काळ बॉलिवूडशी संबंध होता. हातावर मोजता येईल इतके चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला आहे. परंतु त्याच्या आयुष्यात असे काय घडले होती कि त्याला त्या घटने खूप मोठा धक्का बसला होता.

अगदी चित्रपटाप्रमाणे त्याचे कुटुंब एका रात्रीमध्ये संपलं होत. त्याच्या वडिलांनी कमलच्या आई आणि बहिणीला  गोळ्या घालून स्वतःला गोळ्या मारून आत्महत्या केली होती.

ही घटना खूप भयानक होती. त्यावेळी हा अभिनेता केवळ २० वर्षांचा होता. मात्र ही घटना ज्यादिवशी घडली त्या दिवशी कमलचा २०वा वाददिवस होता. त्याच दिवशी त्याचे संपूर्ण कुटुंब संपले होते.

कमल बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता होता. मात्र या अभिनेत्याला अनेकजण विसरले आहेत. या  अभिनेत्याचा जन्म २१ ऑक्टोबर १९७० साली झाला होता. तर १९९२ साली कमलने बेखुदी या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

मात्र या चित्रपटामध्ये कमलसोबत काजोल देखील झळकली होती. या चित्रपटापासून काजोलने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. आज देखील काजोल चित्रपटांमध्ये सक्रिय असल्याचे दिसते. परंतु काजोलसोबत याच चित्रपटातून फिल्मी करिअर सुरुवात करणारा अभिनेता कमल सदाना मात्र  इंडस्ट्रीमध्ये मोठा पल्ला गाठू शकला नाही.

अनेक वर्षांपासून कमल बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दुरावला आहे. मात्र या अभिनेत्या आयुष्यात असे काय घडले होती कि जाणून सगळ्यांना धक्का बसेल. तर ही घटना अशी होती कि,  बृज सदाना म्हणजेच कमलचे वडील यांनी आई व बहीणीची गोळ्या घालून हत्या करत स्वतः देखील आत्महत्या केली होती.

ही सगळी घटना कमलच्या डोळ्यांसमोर घडली होती. मात्र या सगळ्या दरम्यान कमलच्या वडिलांनी कमळावर देखील गोळी चालवली होती. परंतु कमल या अपघातामधून थोडक्यात वाचला. ही भयानक घटना कामाच्या २०व्या वाढदिवसा दिवशी घडली होती.

या घटनेबद्दल कमलने एक मुलाखाती दरम्यान सांगितले होती.  कमल म्हणाला होता कि, त्याच्या आईवडिलांमध्ये सतत वाद होत होते. ही घटना घडली त्यादिवशी कमलचा  २०वा वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्या आई बाबांचे भांडण सुरु झाले म्हणून कमल त्याच्या रूममध्ये गेला होता.

मात्र थोड्यच वेळात कमलला गोळी झाडल्याचा आवाज आला म्हणून तो घाबरून बाहेर आला होता. त्यावेळी त्याला दिसले कि त्याच्या बाबांनी आईवर आणि बहिणीवर गोळी झाडल्या होत्या.

त्या दोघी घटनास्थळी रक्तबोंबल होऊन खाली पडल्या होत्या. त्या दोघींचा गोळ्या लागताच मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या बाबानी कमलला बघून त्याच्यावर देखील गोळीबार केला होता. मात्र ती गोळी कमलच्या कानाला चाटून गेली होते आणि कमल वाचला होता. त्यानंतर कमल सांगतो कि, त्याच्या बाबानी स्वतःवर गोळी झाडली आणि आत्महत्या केली होती. ही सर्व घटना कमलच्या डोळ्यांसमोर घडली होती. त्यामुळे त्याला या घटनेचा भयानक धक्का बसला होता.

त्यामुळे अनेक वर्षे कमल डिप्रेशनमध्ये जगात होता. त्याच्या डोळ्यासमोर सतत त्याच्या आई आणि बहिणीचे हत्येची दृश्य येत होते. त्यामुळे तो खूप खचला होता. मात्र त्याच्या वडिलांनी असे का केले  हे अद्यापि कमलला समजले नाही.

मात्र कमलने पदार्पण केला त्याचा पहिला चित्रपट बेखुदी काय खास चालला नाही. परंतु त्याचा दुसरं आलेल्या रंग या चित्रपट खूप गाजला होता. ज्यामुळे त्याला एक नवीन ओळख मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होत. त्यात बाली उमर को सलाम, रॉक डान्सर, हम सब चोर है, कर्कश, व्हिक्टोरिया नंबर २०३ अश्या चित्रपटांचा समावेश आहे.

मात्र कमलच्या रंग चित्रपटा इतके त्याचे बाकी चित्रपट चालू शकले नाही. त्यामुळे नंतर त्याने अभिनय सोडायचा निर्णय घेतला होता. त्याने अभिनय सोडला आणि त्याचा कल  दिग्दर्शनाकडे नेला. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. नुतक्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यानी सांगितले आहे कि, अ‍ॅक्टिंग सोडून तो आनंदी आहे.

Leave a Comment