साऊथ अभिनेता प्रभास लवकरच अडकणार लग्न बंधनात; या अभिनेत्रीशी करणार आहे लग्न…

या वर्षी बॉलिवूड आणि बाकी इतर इंडस्ट्रीमधून अनेक कलाकारांच्या लग्नाची सनई वाजत आहे. तर या वर्षीच साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश या देखील लग्न केलं आहे.
तर आता बाहुबली प्रभास आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे बातम्या समोर येत आहेत. मात्र त्याचे चाहते त्याची होणारी पत्नी कोण असणार आहे याच्या उत्सुकतेत आहेत.(South Actor Prabhas Will Get Married Soon; Going to marry this actress…)

हँडसम हंक प्रभास आता ४२ वर्षाचा आहे. त्याच्या घरचांनी त्यांच्यासाठी एक सुंदर मुलगी शोधली आहे. असे समजले आहे कि त्याच्या लग्नाची तयारी देखील सुरु करण्यात आले आहे. असे त्याच्या  कुटुंबियांनी मीडियाला सांगितलं आहे. प्रभासचे काका आणि रिबेल स्टार कृष्णनामराजू यांनी एक मुलाखती दरम्यान सांगितले होते कि, याच वर्षी प्रभासचे लग्न होणार आहे.

पुढे ते सांगत म्हणाले की, आह्मी त्याच्यासाठी एक मुलगी शोधली आहे. त्याच्या लग्नाची घोषणा आह्मी लवकरच करू असे देखील ते म्हणले. मात्र  प्रभासच्या चाहत्यांना त्याची अनुष्कासोबतची  जोडी खूप पसंत केली जाते.

अनेक दिवसांपासून या दोघांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. मात्र अनुष्का आणि प्रभास लग्न करणार आहेत अश्या देखील अफवा समोर येत होत्या.

या सगळ्यानंतर जेव्हा प्रभासच्या लग्नाची बातमी समोर आली आणि  त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. परंतु त्याचे सगळे चाहते त्याच्यासाठी खूप आनंदी असल्याचे देखील सोशल मीडियावर दिसत आहे.

प्रभासच्या चाहत्यांना प्रभास आणि अनुष्काची ऑनस्क्रीन जोडी फार आवडते. तर प्रभास आता ४२ वर्षाचा आहे तर अनुष्का  ४०  वर्षांची आहे.

दोघे देखील त्यांच्या कॅरीरमध्ये खूप आघाडीवर आहेत. तर अनेक चित्रपटामध्ये ही जोडी चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. मात्र या दोघांच्या चाहत्यांना या दोघांची लग्ने कोणासोबत होणार आहे याची आतुरता लागले आहे.

Leave a Comment