या प्रसिद्ध मराठमोळ्या जेष्ठ अभिनेत्रीला ओळखला का? त्यांची गाणी आणि चित्रपट आहे आणखीन लोकप्रिय…

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार पाड्यापासून दुरावले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे  ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचे आहे. जर एखादा दुरावलेला कलाकार प्रेक्षकांच्या पुन्हा अभिनयाच्या रूपात समोर आला तर त्यांच्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना आला आहे. हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा आहे. (Do you know this famous Marathi  senior actress? His songs and movies are even more popular.)

हा चित्रपट इतका उत्कृष्ठ आहे कि  प्रेक्षकांसोबत सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटाला खूप वाव दिला आहे. एकूणच सगळयांना हा चित्रपट खूपच पसंत पडला आहे. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा  होत  असल्याचे  दिसत आहे. या चित्रपटामध्ये अनेक नामवंत आणि दिग्ग्ज कलाकारांनी काम केलं आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट आपलासा वाटतो अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महेश टिळेकर यांनी चित्रपटाच्या प्रीमिअर शोला ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना आमंत्रित केलं होत. चित्रपटाचे  प्रीमिअर पाहून अभिनेत्री लीला गांधी यांनी सगळ्या कलाकारांचे खूप कौतुक केले होते.

खूप वर्षाच्या कालावधीनंतर लीला गांधी यांना पाहून प्रेक्ष खूप खुश झाल्याचे दिसत आहेत. प्रसिद्ध नृत्यांगना तसे एक उत्तम अभिनेत्री देखील त्या आहेत. त्यासोबत त्या एक उत्तम लावणी कलावंत देखील आहेत. त्यांनी राज्यभर या लोककलेला  प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळून द्याच खूप मोठं काम केलं आहे.

महाराष्ट्रातील गावागावात जाऊन त्यांनी लावणीचा प्रसार केला होता. ज्या काळात लावणी हीन समजली जात होती त्या काळात देखील त्यांनी जिद्दीने ही कला जपली होती. अपुऱ्या सुविधा असताना सुद्धा त्यांनी ही कला तितक्याच प्रामाणिकपणे सर्वांपर्यंत पोहोचवली होती. लीला गांधी यांच्या आई गायिका होत्या.  त्यांच्या मुलीने नृत्य क्षेत्रात स्वतःचे नाव कमवावे अशी त्यांची इच्छा होती.

त्यानंतर लीला यांच्या  आईने  वयाच्या आठव्या वर्षीच लीला यांना  गोविंद निकम यांच्याकडे कथ्थकचे पाठ लावले होते. मात्र लीला त्यांच्या आई यांना त्या त्यांचा पहिला गुरु मानतात. एके दिवशी नृत्याचे कार्यक्रम होता. त्यावेळी लीला गांधी यांनी भावगीतावर लावणी नृत्य केले होते. त्यावेळी तो कार्यक्रम पाहण्यासाठी भगवान दादा तिथे आले होते. तेव्हा त्यांना लहान लीला गांधी यांनी सादर केलेली लावणी त्यांना अतिशय आवडली होती.

त्याच दरम्यान भगवान दादा यांच्या रंगीला या चित्रपटाचे काम सुरु होते. त्यावेळी त्यांनी लीला गांधी यांना चित्रपटामधील एका गाण्यामध्ये  नृत्य करण्याची संधी दिली होती. लीला गांधी यांना तमाशाप्रधान चित्रपटामुळे नवीन ओळख मिळाली होती. त्यांच्यावर चित्रीत झालेलं कुण्या गावाचं आलं पाखरू हे गं खूप प्रसिद्ध झाले होते. आज देखील लोक हे गाणं आवर्जून ऐकतात. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात आशीर्वाद, केला ईशारा जाता जाता, भिंगरी, फटाकडी या चित्रपटांचा समावेश आहे.

लीला गांधी यांना नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी हिंदी चित्रपटामधून मिळाली होती. मात्र त्यांनी त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या चार अपत्यांचा सांभाळ करत नृत्याची हि  कला जपली होती. परंतु नंतर त्यांच्या वयामुळे आणि गुडघेदुखीमुळे त्यांनी हे कार्यक्रम कारण बंद करावे लागले  होत. या सगळ्यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरी जावे लागले होते. त्यांना महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन लावणी सादर करताना भरपूर हीन दर्जाची वागणूक दिली जात असायची. तरी देखील त्यांनी त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी हा त्रास सहन केला होता.

किडनीच्या आजाराने लहान वयातच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या आज  तिन्ही मुली खूप खुश आणि समाधानि आयुष्य जगात आहेत. त्या तीन मुलींना त्यांच्या आईचा प्रचंड अभिमान आहे असे त्यांनी सांगितले होते. परंतु हवाहवाई चित्रपटानिमित्त लीला गांधी यांना बऱ्याच  वर्षानंतर पाहायला मिळालं होते. त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. त्यांचे आज देखील  ऐन दुपारी यमुना तिरी. बाई माझी करंगळी मोडली हे जण खूप लोकप्रिय आहे आणि चाहते आवर्जून ऐकतात व बघतात.

Leave a Comment