बाबा लगीन डायलॉग म्हणारा बाब्या आठवतोय का? आता आहे या अवस्थेत, ओळखणेही झाले आहे कठीण…

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट येत जात असतात. परंतु काही चित्रपट असे असतात जे आपण किती पहिले तरी देखील कंटाळा येत नाही. असाच काहीसा चित्रपट होता पछाडलेला. पछाडलेला त्या काळात खूप गाजला होता.

प्रेक्षकांना त्या चित्रपटाच्या गणांनी आणि डायलॉगने वेड लावले होते. हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता.(do you remember babya who used to say baba lagin dialogue, See how it looks and what it does, get to know)

या चित्रपटाचे  दिग्दर्शिन महेश कोठारे यांनी केलं होत. बॉक्स ऑफिसवर  या चित्रपटाने ७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये इनामदारांच्या मोठा वाडा दाखवण्यात आला होता.

या चित्रपटामध्ये बाब्या  ‘बाबा लगीन’ म्हणत मनीषा सोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु भरत, रवी आणि समीर हे तिघे जण मनीषाला या कठीण काळातून वाचवत आणि या सगळ्याच्या धडपडी भवती हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. मात्र त्यावेळी त्यातील बाब्याचे पात्र खूप गाजले होती.

आज देखील या चित्रपटातील बाब्या आणि त्याचा बाबा लगीन हा डायलॉग प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अमेय हुनसवाडकर या अभिनेत्याने बाब्याचे पात्र साकारले होते. अमेय हुनसवाडकर याने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

मात्र जेव्हा हा कलाकार त्याच्या आयुष्यात लहान ,मोठ्या  भूमिकेची कामे करत होता.  त्यावेळी त्याच्या करिअरला बाब्याच्या भूमिकेने खूप मोठे वळण मिळालं.  त्यानंतर त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर आणि विनोदाचे टायमिंगने त्याला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामे मिळू लागली होती.

त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची छाप सोडली.  त्यात नायक, तुझे मेरी कसम, प्‍लॅन, रॉकी अँड अकसर, बॉम्‍बे टू बँकॉक, व्हिक्‍टोरिया नं २०३, अजब प्रेम की गजब कहानी अशा चित्रपटांचा समावेश आहे.

पछाडलेला या मराठी चित्रपटानंतर या अभिनेत्याने  खबरदार या मराठी चित्रपटामध्ये पत्रकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने फूल 3 धमाल, चतुर नवरा चिकनी बायको, बाबा लगीन, माझी माणसं अश्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

मात्र तो गेल्या काही वर्षा पासून जाहिरात क्षेत्रात देखील काम करताना दिसत आहे. अमेय त्याच्या उत्तम अभिनयामुळे त्याला तिथे देखील खूप वाव मिळत आहे.

मिलेल्या माहितीनुसार अमेय लवकरच आता बॉलिवूडमधील एका चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. बॉलिवूडच्या छत्रीवाली या आगामी चित्रपटामध्ये अमेय रकुल प्रीत सिंग आणि सतीश कौशिक यांच्या सोबत मोठ्या पाड्यावर दिसणार आहे.

छत्रीवाली या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस  देवस्कर करणार आहेत. तर या चित्रपटाची कथा  एका कंडोम फॅक्टरीत काम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीच्या आयुष्यावर दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment