अगं बाई अरेच्चा चित्रपटातील ही चिमुकली आता झाली आहे खूपच मोठी, दिसते खूपच सुंदर, नाव जाणून व्हाल थक्क…

अनेक चित्रपट असे असतात कि त्यांना किती देखील पाहिलं तरी मन भरत नाही. त्यांना  वारंवार पाहावेसे वाटत असते. जास्ती करून लोक कॉमेडी, जादू, किंवा थरारक चित्रपटांना जास्त आवडीने पाहत असतात.  असाच एक मराठी चित्रपट २००४ साली आला होता. अगबाई अरेच्चा! या चित्रपटाने सगळयांना वेड लावले होते.

आगळ्या वेगळ्या कथानकामुळे  हा चित्रपट प्रचंड प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाच्या नायकाला आशीर्वादामुळे मुलींच्या तसेच महिलांच्या मनातलं बोललेलं ऐकू येत होते असे या चित्रपटाची कथा होती.(The actress who spoke the dialogue “O kaka meech mhnale tumala  veda” in the movie Aag Bai Arechcha now looks very beautiful;  played the lead heroine in a film)

या चित्रपटाचे उत्कृष्ठ असे कथानक,  सुपरहिट गाणी , सोनाली बेंद्रेचं आयटम सॉंग आणि सगळ्यात विशेष म्हणजे साताऱ्याची प्रसिद्ध बगाड यात्रा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली त्यामुळे  प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. या मराठी चित्रपटातुन  तेजस्विनी पंडित हिने पदार्पणा केले होते. यात तिने  खलनायिकेची भूमिकेमध्ये काम केलं होत.

अनेक दिग्ग्ज आणि नामवंत कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केलं होत. त्यामध्ये  संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, प्रियांका यादव, भरत जाधव, रेखा कामत, सुहास जोशी, शुभांगी गोखले, विजय चव्हाण, भारती आचरेकर, रसिका जोशी, विजय चव्हाण या कलाकारांचा समावेश होता.

यातील अनेक कलाकारांनी  मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्मण केली आहे. तर यातील अनेक कलाकार काळा आड गेले आहेत. या चित्रपटामध्ये एका लहान मुलीने काम कल होते. तिने चित्रपटाच्या नायकाला मनातल्या मनात वेडा अशी हाक मारली होती.

हे नायकाला कसे ऐकू गेले हा प्रश्न त्या लहान मुलीला पडला होता. मात्र नंतर टी मुलगी बोलते ‘ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा..’ असे म्हणत ती नायकाला वाकड दाखून पळून जाते. हा चित्रपट २००४मध्ये आला होता. मात्र ही लहान मुलगी आता इ चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करताना दिसणार आहे. ही लहान चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून दिग्दर्शक केदार शिंदे यांचीच मुलगी सना शिंदे आहे. एका बहुचर्चित चित्रपटातून लवकरच सना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आज पर्यंत अनेक लोककरांना केदार शिंदे यांनी  अभिनयाची संधी मिळवून दिली होती.  त्यांची मुलगी  महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट  शाहीर साबळे म्हणजेच  सनाचे पंजोबा यांच्यावर आधारित असणार आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तर सना शिंदे  ही शाहीर साबळें यांच्या पत्नीच्या कृष्णराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. थोडक्यत सना या चित्रपटामध्ये स्वतःच्या पणजीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.   त्यामुळे हा चित्रपट सनासाठी खूप महत्वाचा आहे. चित्रपटाचे शूटिंग चालू झाले आहे.

Leave a Comment