प्रिया बेर्डे आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांची दुसरी पत्नी, ही अभिनेत्री बरोबर केले होते पहिले लग्न…

लक्ष्याच्या नावाने सर्वत्र ओळखला जाणारे प्रसिद्ध मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. या अभिनेत्याने त्यांच्या अतिशय उत्तम अभिनयाने प्रेक्षांच्या मानत घर केलं होत. नव्वदीच्या दशकातील लोकांचे  या अभिनेताने त्यांच्या विनोदी भुमिकेने खूप मनोरंजन केलं आहे.

अशोक सराफ,लक्ष्या आणी महैश कोठारे हे तिघे देखील मराठी रंगभुमीचे त्रिदेव होते.  या त्रिकुटाचे चित्रपट प्रचंड चालत असायचे. त्यांच्या अभिनयाची लोक वेड झाले होते. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Priya Berde is the second wife of famous actor Laxmikant Berde!! Know who is his first  wife)

आज देखील लक्ष्मीकांत यांचे चित्रपट लोक आवर्जून बघतात. अशोक सराफ,लक्ष्या आणी महैश कोठारे या तिघांची  मैत्री इतकी घट होती कि एकचे नाव घेतले कि,बाकी दोघांची नावे आपोआप तोंडावर येत होती. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांची मैत्री अर्ध्यतच सोडून गेले.  २००४ मध्ये वयाच्या ५४’व्या वर्षी  लक्षमिकांत यांनी जगाचा निरोप घेतला होता.  त्याच्या जाण्याने बॉलिवूड आणि   मराठी इंडस्ट्रीमध्ये शोककाळ पसरला होती.

त्यांनी त्यांच्या अभिनयाला सुरुवात गणेशोत्सव आणि काॅलैजमधील स्टेज शो आणि स्पर्धांमधुन सहभाग घेत केली होती.  “टुर-टुर” या नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना १९८३-८४च्या पुरुषौत्तममध्ये संधी मिळाली होती. त्यानंतर ते “शांतेचं कार्ट चालु आहे!” “बिघडले स्वर्गाचे दार” यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. परंतु मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये त्यांनी “लेक चालली सासरला” चित्रपटामधून पदार्पण केले होते.

त्यानंतर मग त्यांनी  “दे दणादण” “धुमधडाका” “अशी ही बनवाबनवी” “थरथराट” “बाळाचे बाप ब्रम्हचारी” “झपाटलेला” असे सुपरहिट चित्रपट केले. मराठी चित्रपटांसोबत लक्ष्मीमंत यांनी “हम आपके है कौन!” “मैने प्यार किया” “बेटा” “साजन” अश्या हिंदी चित्रपटामध्ये देखील त्यांच्या अभिनयाची छाप सोडली.  लक्ष्मीकांत चित्रपटसृष्टीत तर  लोकप्रिय होतेच परंतु ते त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात देखील प्रचंड खळबळजन होते.

कमाल माझ्या बायकोची या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्यांची ओळख अनेक कलाकारांसोबत झाली होती. त्यावेळी त्यांनी ओळख कलाकार रुही सोबत देखील झाली. त्यानंतर ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. त्यांच्या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले आणि नंतर त्यांनी लग्न देखील केलं होत. “आ गले लग जा” हा हिंदी चित्रपट रुहीने शशी कपुरसोबत केला होता. मात्र तिची त्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. तिच्या ओळखीमुळे लक्ष्मीकांत यांना सुरवातीला चित्रपटसृष्टीत काम मिळत होते.

मात्र रुही आणि लक्ष्मीकांत यांचे लग्न जास्त  काळ टिकले नाही. त्याचे कारण होते “रमत-गमत” चित्रपटादरम्यान लक्ष्मीकांत आणि प्रिया अरुणची ओळख. यावेळी त्यांचे प्रेम प्रकरण खूप गाजले होते. या सगळ्यामुळे रुही आणि लक्ष्मीकांत यांच्यामध्ये वाद वाडत गेले. मात्र लक्ष्मीकांत यांनी त्यांची प्रियासोबतचे नाते तोडले नाही. परंतु त्यांनी रुहीसोबत देखील घटस्फोट घेतला नव्हता. नंतर  प्रियासोबत लिव्हईन रिलेशणशीपमध्ये देखील लक्ष्मीकांत राहत होते.

मात्र हे असेच पुढे १३वर्षां चालू होते. त्यानंतर रुहीला कॅन्सर झाला आणि तिचे निधन झाले.  रुहीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत यांचा संसार मोडला होता. परंतु त्यांनी पुढच्या वर्षी  प्रिया अरुणशी लग्न देखील केले. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना अभिनय व स्वानंदी अशी दोन मुलं आहेत. परंतु आज ते आपल्यात नाहीत. मात्र अभिनय वडिलांचा वारसा पुढे चालवत असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment