पंढरीची वारी चित्रपटातील हा बालकलाकार आता आहे या अवस्थेत, ओळखणे ही झाले आहे कठीण…

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट आले व गेले. परंतु पंढरीची वारी असा चित्रपट आहे जो कायम प्रेक्षकांच्या मनत राहील. हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झळा होता. या चित्रपटाने सारवण वेड लावले होते. हा चित्रपट त्या काळच्या सुपरहिट चित्रपटांपैके एक होता.  या चित्रपट आणि त्यातील गाणी एकटी प्रसिद्ध झाली होती.

आज देखील ती गाणी खूप भक्तीने आणि आपुलकीने लावली जातात. त्यातील धरिला पंढरीचा चोर हे गं आज देखील ऐकलं जात. (Do you remember the child actor from the famous Marathi film Pandhirichi Wari? Find out who he was and where he is now.)

या चित्रपटामध्ये  अनेक दिग्गज कलाकारांनी महत्वाच्या भूमिकेत काम केलं आहे. जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ यांचा समावेश होता. तर या चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी केली होती. रमाकांत कवठेकर यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले होते.

पंढरीची वारी या चित्रपटामध्ये दाखवलं आहे कि,  जयश्री गडकर यांच्या कुटुंबाला पंढरीच्या वारीला जाताना रस्त्यामध्ये एक लहान मुलगा भेटतो.   तर तो लहान मुलगा पुढे जाऊन जयश्री गडकर यांच्या कुटुंबाला  सांभाळत रहातो असे दाखवलं आहे. मात्र तो लहान मुलगा त्या चित्रपटामध्ये मुका दाखवला आहे. त्यामुळे तो मुलगा कोणाशी देखील बोलत नाही. परंतु त्या अभिनेत्याने त्यांच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली होती.

मात्र संवाध न साधता फक्त  हावभावाकरून अभिनय करणे हे प्रचंड अवघड काम आहे. परंतु या अभिनेत्याने ते अतिशय उत्तम पद्धतीने केलं आहे. चित्रपटाच्या शेवटच्या क्षणांमध्ये विठोबाची भूमिका साकारणारा हा चिमुरडा सर्वांच्या डोळ्यात पाणी आणतो. मात्र या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारल्याचे पाहायला मिळत आहे.

बकुळ कवठेकर या अभिनेत्याने विठोबाची भूमिका साकारली होती.  बकुळ कवठेकर हा या चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा मुलगा आहे. बकुळ याने बालकलाकार म्हणून याच चित्रपटामध्ये काम केलं आहे.  मात्र या चित्रपटानंतर या अभिनेत्याने परत कोणत्याच चित्रपटामध्ये काम केलं नाही.

बकुळ कवठेकर या अभिनेत्याने फाईन आर्टस् चे शिक्षण भारती विद्यापीठामधून घेतले होते. परंतु  २००२ साली त्यांचे शिक्षण सुरु असताना बकुळचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मराठी इंडस्ट्रीने हा उत्तम कलाकार खूप आधीच गमावला आहे. बकुळ कवठेकर याचा भाऊ  भाऊ समीर कवठेकर एक  निर्माते आहेत. त्यांची स्वतःची  “बकुळ फिल्म्स” नावाने निर्मिती संस्था आहे.

समीर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून स्वराज्यरक्षक संभाजी”, ” स्वराज्यजननी जिजामाता”, राजा शिवछत्रपती” या मालिका तसेच “अजिंठा”, “बालगंधर्व” या चित्रपटाची देखील निर्मिती केली आहे.  तरी त्यांनी काही बॉलिवूड चित्रपांसाठी काम केलं आहे. त्यातील  खाकी, मंगल पांडे हे चित्रपट आहे.

पंढरीची वारी या चित्रपटामध्ये बकुळ कवठेकर यांनी अतिशय उत्तम भूमिका केली आहे. ज्या पध्दतीने बकुळ कवठेकर यांनी विठ्ठलाची भूमिका साकारली आहे ते नेहमी सगळ्यांच्या लक्षत राहील. या अभिनेत्याची या चित्रपटातील भूमिका बघून विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते. त्याने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकली आहेत.

Leave a Comment