अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांसाठी गोड बातमी; दसऱ्याच्याच दिवशी…

महाराष्ट्रात नवरात्रौउत्सव खूप धुमधडाक्यात साजरा केला गेला. सर्वत्र लोक गरबा आणि दांडिया खेळत होते.  दोन वर्षाच्या महामारीच्या काळानंतर अश्या जलोषात नवरात्रौउत्सव साजरा करण्यात आला आहे. देवीची गाणी लावून अनेकांनी दांडीया आणि गरब्याचा आनंद घेतला होता. (cricketer Ajinkya Rahane became a father on the same day of Dussehra.)

रावण दहन करून सर्वांनी दसरा साजरा केला आहे. तो आनंद आज ही आहे तोवर आणखीन ये आनंदाची बातमी समोर आली आहे. ही आनंदाची बातमी क्रिकेट विश्वातून आली आहे. भारताचा एक क्रिकेटपटूला दुसऱ्यांदा वडील बनण्याचे भाग्य लाभले आहे.

दुसऱ्यांदा आई-वडील होण्याचे भाग्य भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर यांना भेटलं आहे. राहाणेची मुलगी आर्या हीचा तिसरा वाढदिवस रहाणेने मंगळवारीच  साजरा केला आहे. २०१४ मध्ये अजिंक्य राहणे आणि राधिका यांनी लग्न केलं होते. लहानपणापासून दोघे एकमेकांना ओळखत होते. एकाच शाळेत हे दोघे शिकत होते.

रहाणेने एका शोमध्ये सांगितलं होत कि, तो राधिकाच्या घरी लग्नाची बोलणी करायला मित्र आणि नातेवाईकांसह टी-शर्ट आणि जीन्स घालून  गेला होता. कारण त्याच्याकडे कपडे खरेदीसाठी देखील वेळ नव्हता असे त्याने सांगितले. ऑक्टोबर २०१९मध्ये अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांना मुलगी झाली होती. मात्र आता ते दोघे दुसऱ्यांदा पालक झाले आहेत.

बुधवारी राहणे याने ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली. ही आनंदाची बातमी पोस्ट करत राहणे याने लिहले कि, ‘आज सकाळी राधिका आणि मी आमच्या दुसऱ्या बाळाचे या जगात स्वागत केले. राधिका आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो’. ही बातमी राहणेने ही गोड बातमी त्याच्या चाहत्यांना  ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली. रहाणेने त्याची पत्नी गरोदर असल्याचे जुलैमध्ये सांगितलं होत.

रहाणे भारतीय कसोटी संघासाठी अनुकूल नसलेल्या त्याने त्याचे पुनरागमन नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमधून केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघात खेळात असताना रहाणेच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर राहणेने २०२२ पासून एक देखील आयपीएल सामना खेळाला नाही. मात्र दुसऱ्यांदा पालक झाल्यामुळे चाहत्यांसह सर्व खेळाडू आणि सेलेब्रिटीज यांनी  भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, रहाणेने तीन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर दिलीप ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. पश्चिम विभागाचे नेतृत्व विक्रमी १९व्या दिलीप ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. राहणेसह पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि जयदेव उनाडकट अशे खेळाडू राहणेसोबत संघात होते. रहाणेच्या संघाने  दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातदक्षिण विभागाला  294 धावांची प्रभावाची धूळ चारली.

रहाणेने दिलीप ट्रॉफीमध्ये पुनरागमन करताना नाबाद 207 धावांसह 250 धावा केल्या. मुंबईचे नेतृत्व करत राहणे आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. राहणेसोबत यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ, सरफराज खान आणि शार्दुल ठाकूर यांनाचा देखील मुंबईच्या संघात समावेश असणार आहे. मात्र हे सगळे देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी प्रभावी खेळाडू आहेत.

Leave a Comment