ही बॉलिवूड अभिनेत्री झाली लग्नाआधी प्रेग्नंट; नंतर झाला ग’र्भपात, सलमान खानसोबत केलं होत…

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींनबद्दल अनेक बातम्या व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या सतत चर्चेत येत असतात.  सध्या अश्याच एका अभिनेत्रीची चर्चा आता होत आहे.  ‘रेडी’ या चित्रपटामधून अभिनेता सलमान खानसोबत अभिनेत्री कुब्रा सैतने पदार्पण केले होते.(This Bollywood actress got pregnant before marriage; Later there was an abortion, she made her debut in Bollywood with Salman Khan)

मात्र ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. ‘ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर’ हे पुस्तक या अभिनेत्रीने प्रकाशित केले आहे. या अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल खूप धक्कादायक खुलासे या पुस्तकात तिने केले आहेत.

‘ओपन बुक’ या पुस्तकामध्ये कुब्राने तिच्या गर्भपाता विषयीच्या हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. मद्यपान केल्यानंतर मित्रासोबत कसा वेळ घालवला याबद्दल कुब्राने तिच्या ‘आय वॉज नॉट रेडी टू बी अ मदर’ या पुस्तकाच्या एका अध्यायामध्ये सांगितलं आहे.  कुब्रा त्या एका रात्रीनंतर कशी गरोदर राहिली होती आणि नंतर तिने कसा गर्भपात केला हे त्या पुस्तकात सांगितले आहे.

कुब्रा सैत अंदमानला २०१३मध्ये वेकेशनसाठी गेली होती. कुब्रा सैतचे त्यावेळी ३० वय होते. बंगळुरूमधील सुरुवातीच्या दिवसांबद्दल बऱ्याच गोष्टी कुब्राने तिच्या ओपन बुक या पुस्तकामध्ये सांगितल्या आहेत. बॉडी शेमिंग आणि लैंगिक शोषणासारख्या तिच्यासोबत घडलेल्या घटना तिने सांगितल्या आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुब्रा सैतने तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर तिला काय वाटले व तिने ते कसे  हँडेल केले याबद्दल सांगितलं होते. एका मुलाखतीमधील संवादात कुब्रा म्हणाली कि, त्यावेळी ती या सगळ्यासाठी बिलकुल तयार नव्हती आणि ती ता देखील तयार नाही असे तिला वाटते.

पुढे ती म्हणली कि, ”23 व्या वर्षी लग्न आणि 30 व्या वर्षी मूल जन्माला घालण्यासाठी महिलांवर दबाव टाकला जातो आहे हे मला समजत नाही. मला हे माहित होतं की, मी यासाठी तयार नाही आणि मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयाबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही.”

कुब्राला तिचा गर्भपात झाल्यानंतर काय वाटले होते यावर सांगत ती म्हणली कि, ”नक्कीच मला एका भयानक व्यक्तीसारखं वाटत होतं, पण मी असं का केलं याचं मला वाईट वाटलं नाही, मात्र मला याची भीती वाटत होती की, लोकं याबद्दल काय म्हणतील. ते समजून घ्या कधीकधी स्वत: ला मदत करणं कठीण होऊ शकतं. मात्र तुम्हाला हे करावं लागेल.”

अभिनेता सलमान खानच्या रेडी या चित्रपटामधून अभिनेत्री कुब्रा सैतने बॉलिवूडमध्ये तिचे पहिले पाऊल ठेवले होते. मात्र ती या चित्रपटामध्ये खूप छोट्या भूमिकेत दिसली होती. नंतर या अभिनेत्रीने ‘जवानी जानेमन’, ‘सुलतान’, ‘सिटी ऑफ लाइफ’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  ‘सेक्रेड गेम्स’ या ओटीटी शोमुळे तिचे वेगळी ओळखलं निर्माण झाली होती.

Leave a Comment