प्रवीण तरडेंच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी…

सोशल मीडियावर सतत कोणता न कोणता कलाकारांची चर्चा रंगतच असते. मात्र काही कलाकार अशे असतात जे सतत चर्चेत असतात. अभिनेता व दिग्दर्शक प्रविण तरडे देखील सतत चर्चेत असल्याचे पाहिलं मिळते. मात्र यावेळी ते खूप वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.(A strange incident happened with actor-director Pravin Tarde; You will be surprised to hear)

प्रवीण तरडे यांचे चाहते खूप नाराज झाले आहे. त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टने त्यांच्या चाहत्यांना धक्काच दिला आहे. प्रवीण तरडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे कि त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. अशी माहिती त्यांनी पोस्टच्या स्वरूपात त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.

तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची बातमीमुळे त्यांची खूप चर्चा होता आहे. नुकताच त्यांनी धर्मवीर चित्रपट दिग्दर्शित केला होता. या अभिनेत्याने ही माहिती त्यांच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले आहे कि, माझ्या फेबसबुकवरून आलेल्या मेसेजला रिप्लाय करू नका.

प्रवीण यांनी एका पाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. सोशल मीडियावर अभिनेता प्रवीण तरडे नेहमी सक्रिय असतात. प्रवीण त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना लेटेस्ट अपडेट देत असल्याचे दिसत असते.

अशातच त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यामुळे प्रवीण यांना धक्काच बसला आहे. जेव्हा प्रवीण यांना ही गोष्ट समजली त्यांनी लगेच त्यांच्या इंन्स्टग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही माहिते दिली.  प्रवीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक हॅक झाल्यानंतर त्यांच्या अकाउंट वरून खोट्या लिंक्स आणि फोन नंबरची मागणी करण्यात येत आहे.

प्रवीण यांच्यासोबतच ही घटना घडली नाही तर इतर अनेक मराठी  कलाकारांचे  फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते. ‘झिम्मा’चा दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमे याचे अकाउंट देखील काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते.

तर याआधी अभिनेता संतोष जुवेकरनं आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे देखील फेसबुक हॅक झाल्याची बातमी समोर आली होती. सायबर पोलिसांमध्ये या बद्दलची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Leave a Comment