‘सिंघम’ चित्रपटातील खलनायक शिवाची पत्नी देखील आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री; या चित्रपटात केले आहे काम…

प्रेक्षक फक्त चित्रपमधील मुख्य नायकाचे फॅन नसतात. तर काही कलाकार असे असतात जे चित्रपटामध्ये सहाय्यकाची किंवा खलनायकाची भूमिका करून देखील प्रेक्षकांचे मनं जिंकली आहेत.
अशोक समर्थ(Ashok Samarth) हे एक असे नाव आहे ज्याने कधी सहाय्यक तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.(The wife of Shiva, the villain of the film ‘Singham’ is also a famous actress; Find out who she is)

सिंघम, सिंबा, शेरसिंग, गली गली चोर है अशा अनेक चित्रपटातून या अभिनेत्याने सहाय्यक कलाकार आणि खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सोबतच अशोक समर्थ यांनी मराठी चित्रपट देखील केले आहेत. अशोक समर्थ यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबतच मराठी इंदूस्त्रीमधे देखील स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  त्यामुळे ते खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत.

या अभिनेत्याचे मूळ गाव बारामती आहे. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण बारामतीमधेच पूर्ण केलं आहे. बाकी शिक्षण अशोक यांनी पुण्यात घेतले. त्यादरम्यानच त्याचा परिचय रंगभूमीशी झाला होता. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती.  ते आवड त्याना थेट मुंबई पर्यंत घेऊन पोहोचली होती. अशोक यांनी माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पाहिलं पाऊल ठेवलं होत.(

त्यानंतर एसीपी अभय कीर्तिकर यांची उत्कृषठ आणि दमदार भूमिका त्यांनी  लक्ष्य या लोकप्रिय मालिकामध्ये केली होती. अशोक यांच्या या भूमिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. अभय कीर्तिकर ही  भूमिका तब्बल ५ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. त्यानंतर अशोक यांनी हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये देखील काम केलं आहे.

त्याने बॉलिवूडमध्ये इंसान या चित्रपटामधून पहिले पाऊल टाकले होते. मात्र अशोक यांचे शिवा पात्र खूप लोकप्रिय झालं होत. पात्र त्यांनी रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपटामध्ये साकारले होते.  त्या पात्राला लोकांनी खूप प्रेम दिल आणि अशोक देखील प्रसिद्धी झाले होते. या चित्रपमध्ये त्यांनी बोललेले डायलॉग देखील प्रचंड लोकप्रिय झाले होते.

रावडी राठोड, सिंबा, गली गली चोर है, सत्या २, आर राजकुमार, शेरसिंग या सगळ्या चित्रपटनमध्ये त्यांनी ऊत्तम अभिनयासोबत  दमदार भूमिकादेखील साकारल्या होत्या. याशिवाय अशोक यांनी बार्डो, बेधडक, दंडीत, बकाल, विट्टी दांडू  अश्या मराठी हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अशोक समर्थ यांनी अभिनेत्री शीतल पाठक यांच्या सोबत २१ फेब्रुवारी २०२० रोजी लग्न केले. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैके  शीतल पाठक एक आहेत. कृपासिंधू या चित्रपटात शीतल पाठक यांनी मिलिंद गवळी यांच्यासोबत महत्वाची भूमिका साकारली होती.

यासोबतच शीतल यांनी चेहरा, मंडळी तुमच्यासाठी कायपण, गाव माझं तंटामुक्त, बाय गो बाय, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य या मराठी  चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शीतल यांनी जो भी होगा देखा जायेगा हे मराठी नाटक देखील केलं आहे. त्या नाटकातून त्यांनी व्यावसायिक नाटकात त्यांचं पहिलं पाऊल टाकलं होत.

अशोक समर्थ आणि शीतल पाठक यांनी ट्रॅफिक जॅम हा मराठी चित्रपट केला होता. हा चित्रपट २०१३ झाली प्रदर्शित झाला होता.  हे दोघे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंतर या दोघांची एकमेकासोबत ओळख झाली होती. त्यांना दोघांना  चित्रपट दिग्दर्शित करण्याची खूप इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तब्बल ७ वर्षांनी अशोक समर्थ यांनी वर्धमान पुंगलिया निर्मित ‘जननी’ या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. बारामतीमध्ये या चित्रपटाचे सगळे शूटिंग पार पडले आहे. हा चित्रपट आता पूर्णत्वाकडे आला आहे, त्यामुळे तो लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment