अभिनेता अक्षय कुमारच्या घरात येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून व्हाल थक्क!

आजकाल सर्वजण खूप हेल्थ कॉन्शस झाले आहेत. आपल्या फिटनेस बद्दल तरुणाई खूप सतर्क असते. ह्या इंटरनेटच्या काळात फिटनेसची खूप माहिती उपलब्ध असल्याने लोक स्वतः माहिती गोळा करून आपला आहार निश्चित करतात.

पौष्टिक आहार घेण्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामध्ये दूध, अंडी, शेंगदाणे, चणे, प्रोटीन यांचा समावेश ते आपल्या आहारात करतात. फिटनेस व्यवस्थित ठेवण्याच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्स देखील खूप सतर्क असतात.

बॉलिवूड स्टार्स लक्झरी लाइफस्टाइल जगतात. ते आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करतात. तुम्हाला माहीतच असेल बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हेल्थच्या बाबतीत किती जागरूक आहे.

त्याचा दिवस पहाटे ४ वाजता सुरु होतो आणि शेवटचे जेवण ७ च्या आत घेतो. अक्षयला जर रात्री भूक लागलीच तर तो व्हाईट एगच ऑम्लेट बनवून खातो जे पचण्यासाठी चांगलं असते. त्याच्या घरी येणार दूध देखील खूप महाग आहे.

सामान्यतः सर्वांच्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत जरी ४०-५० रुपये प्रतिलिटर असली तरी अक्षय कुमारच्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत १९० रुपये लिटर आहे.

हे दूध गायीचे असते परंतु त्या गाईंना खाण्यासाठी खास आहार दिला जातो ज्यामुळे गायी पौष्टिक दूध देतात.

ह्या गायींच्या दुधात कॅल्शिअम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम हे हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी आवश्यक असते तसेच मसल बिल्डिंग मध्ये देखील याचा फायदा होतो.

ह्या गाईंना RO चे पाणी प्यायला दिले जाते. इतकेच नाही तर त्यांची राहण्याची जागा सुद्धा खूप स्वच्छ असते. उन्हाळ्यामध्ये ह्या गाईंना गर्मी पासून वाचण्यासाठी खास AC ची व्यवस्था केली जाते.

गायीच्या आरोग्याची चाचणी देखील नियमितपणे केली जाते. यातील गाय जर आजारी असेल तर तीच दूध पाठवलं जात नाही.

या गायीचे दूध फक्त वी आय पी लोकांनाच दिले जाते. इतर लोकांसाठी हे दूध उपलब्ध नाही. गायीचं दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो आणि काढून झाल्यानंतर २  तासांच्या आतच हे दूध ग्राहकांच्या घरी पोचवले जाते. हे दूध लवकर ग्राहकांना पोचवल्यामुळे त्यात प्रेजर्वेटिव्हस ऍड केले जात नाहीत.

अक्षय कुमार साठी १९० रुपये लिटर दूध परवडत असले तरी सामान्य नागरिकांना दुधाची हि किंमत न परवडणारी आहे.

अक्षय कुमार कडे येणार दूध जरी आपण घेऊ शकलो नाही तरी १५-२० रुपये अधिक मोजून आपण चांगल्या क्वालिटीचे दूध नक्कीच घेऊ शकतो.

Leave a Comment