अभिनेता अर्जुन कपूरसोबत पारदर्शक टॉप घालून पोहोचली मलायका अरोरा, लग्नाच्या अगोदरच दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज…

बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. हे दोघे गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अनेकवेळा ते सोशल मीडियावरून आपले प्रेम जाहीर करत असतात.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अलीकडेच रात्री उशिरा मुंबईमध्ये आयोजित एका अवॉर्ड फंक्शनमध्ये गेले होते. या अवॉर्डसाठी मलायका अरोराने खूप पारदर्शक ड्रेस घातला होता. रेड कार्पेटवर तिला सर्वजण पाहतच राहिले.

अर्जुन कपूरने तिला मॅचिंग ग्रे कलरची कोट-पँट घातली होती. या दोघांनी देखील अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र एन्ट्री केली होती. या दोघांच्या जोडीला सर्वजण एकटक पाहत होते. विशेष म्हणजे या अवॉर्ड फंक्शन दरम्यान खूप मोठी गुड न्यूज समजली.

एकमेकांचे केले कौतुक 

या अवॉर्ड फंक्शनदरम्यान अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने एकमेकांचे कौतुक केले. मलायका अरोराने सांगितले की अर्जुन कपूर तिने थँक्स म्हणायची वाट पाहत होता. मलायका हे म्हणताच अर्जुन कपूर म्हणाला की, नाही मी तर तुला थँक्स म्हणू इच्छितो.

फक्त तुझ्यामुळेच लोकांनी मला स्टाईलिश म्हटले आहे. तेव्हा मलायकाने उत्तर दिले की आम्ही दोघे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतो. एकमेकांचे कौतुक करत असतो. लोक विचारत आहेत की आम्ही एकमेकांसोबत मॅच करत आहोत पण असे बिल्कुल देखील विचार करून केलेले नाही.

मलायकासोबत खूप सुखात आहे-

यादरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने म्हटले की मला स्टाईलिश बनवण्यासाठी थँक्स. आज मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि हा अवॉर्ड जिंकत आहे.

मी खूप खुश आहे. असे यामुळे मला वाटते की ती मला स्टाईलिश बनवत आहे. तिने मला एक चांगला माणूस बनवले आहे. त्यासाठी थँक्स.

जिंकला मोस्ट स्टाईलिश कपलचा अवॉर्ड –

जेव्हा या अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांना मोस्ट स्टायलिश कपल अवॉर्ड दिला गेला. लग्नाच्या बातम्यांदरम्यान या दोघांना कपल म्हणून मिळालेला अवॉर्ड एखाद्या गुड न्यूजपेक्षा कमी नाही. हे दोघे एकमेकांना बऱ्याच काळ डेट करत आहेत.

दोघांना वेळ मिळेल तसा ते एकमेकांना टाइम देतात. सोशल मीडियावर यांचे अनेक रोमँटिक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

Leave a Comment