३५ वर्ष जुन्या ‘या’ कारणामुळे आज देखील डोक्यावर केस ठेवत नाही अभिनेते राकेश रोशन, जाणून घ्या कायम टाकले राहण्याचे कारण..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि हँडसम अभिनेता हृतिक रोशनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

हृतिकचे वडील अभिनेते राकेश रोशन देखील जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक राहिले आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. नंतर त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली.

हृतिकने आपल्या लुक्सने आणि हेयर स्टाईलने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचे वडील आणि तो एका फेमस पिता-पुत्रांच्या जोडीपैकी एक आहेत. हृतिकचे वडील राकेश रोशन कायम टकलेच दिसतात.

अनेक वर्षांपासून राकेश रोशन टकले दिसतात. यामागे कोणते कारण आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर आज आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत.

राकेश रोशन नेहमी टकले राहण्यामागे एक मोठे कारण आहे. हे कारण तुम्ही जाणून घ्याल तर थक्क व्हाल. आज ७२ व्या वर्षी सुद्धा राकेश रोशन खूप हँडसम दिसतात. परंतु त्यांच्या डोक्यावर केस दिसत नाहीत ते कायम टकलेच दिसतात.

अनेक वेळा अशा बातम्या आल्या की राकेश रोशन यांचे आजारपणामुळे पूर्ण केस गळाले होते पण हे खरे नाही. त्यांचे केस कोणत्याही आजारपणामुळे गेले नाहीत तर यामागे एक विशेष कारण आहे. ही गोष्ट आहे १९८७ ची.

राकेश रोशनने खुदगर्ज चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाच्या सफलतेसाठी राकेश रोशन तिरुपतीच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा त्यांनी एक नवस केला होता की हा चित्रपट सफल झाला तर ते आपल्या केसांचे दान करतील.

१९८७ साली प्रदर्शित झालेला खुदगर्ज हा चित्रपट ३१ जुलैला चित्रपटगृहांत दाखल झाला होता. या चित्रपटात गोविंदा, नीलम कोठारी, कादर खान, शत्रूग्न सिन्हा, जितेंद्र, अमृता सिंह हे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. परंतु राकेश रोशन आपला नवस विसरून गेले. त्यांनी आपल्या पत्नीला यासंबंधी सांगितले. यानंतर ते तिरुपतीला गेले आणि आपले केस दान केले. त्याचबरोबर त्यांनी शपथ सुद्धा घेतली की यापुढे कधीही ते आता डोक्यावर केस ठेवणार नाहीत.

Leave a Comment