राजा हिंदुस्थानी चित्रपटामध्ये करिश्माने केलं होतं आमिरला किस, आता केला खळबळजनक खुलासा…

बॉलिवूड मधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध आणि गाजलेली अभिनेत्री करिष्मा कपूरने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले. दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिचा राजा हिंदुस्थानी हा चित्रपट तर सर्वांनाच माहिती असेल. हा चित्रपट त्यावेळी खूप हिट झाला होता. यातील गाणे अजूनही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात. या चित्रपटाच्या बाबतीत २४ वर्षानंतर करिष्माने एक मोठा खुलासा केला आहे.

राजा हिंदुस्थानी या गाजलेल्या चित्रपटात करिष्मा कपूर सोबत अभिनेता आमिर खान प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

या चित्रपटामध्ये करिष्मा आणि आमिर खानने एक किसिंग सीन देखील केला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. करिष्माने स्वतः सांगितले होते की हा सीन शूट करताना ती खूप थरथर कापत होती

करिष्माने एका मुलाखतीमध्ये सांगितले की राजा हिंदुस्थानी या चित्रपटाबद्दल तिच्या खूप आठवणी आहेत. परंतु जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा लोकांनी किसिंग सीनचीच चर्चा जास्त केली. परंतु त्यांना हे माहीत नव्हते की हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला पूर्ण ३ दिवस लागले होते.

मी अक्षरशः थरथर कापत होते आणि विचार करत होते की हा सीन कधी संपतोय कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये उटीमध्ये इतकी थंडी होती की हा सीन संध्याकाळी ६ वाजता शूट केला होता.

करिष्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. करिष्माचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.

सध्या करिष्मा चित्रपटांमध्ये कमी पाहायला मिळते परंतु अजूनही तिची लोकप्रियता कायम आहे. ती लवकरच वेबसीरीज मेंटलहूडमध्ये दिसणार आहे. करिष्मा कामाबरोबरच मुलांच्या संगोपनाकडे देखील पूर्ण लक्ष देते.

Leave a Comment