हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी आपल्या धडाकेबाज स्टाईलने आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्यांना दोन मुली आहेत. सोनम कपूर आणि रिया कपूर. त्यांची दुसरी मुलगी रिया कपूर ही खूप सुंदर आहे. तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय ती एक फॅशन स्टायलिश आहे आणि बहीण सोनम कपूरसोबत मिळून एक ब्रँड सुद्धा चालवते.
View this post on Instagram
रियाने २०१० मध्ये आयशा चित्रपटाची निर्मिती केली होती. ज्यामध्ये सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही.
आयशानंतर रियाने खूबसूरत हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. नंतर रियाने वीरे दि वेडिंग या चित्रपटाची निर्मिती केली.
या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर सारख्या अभिनेत्री दिसून आल्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.
View this post on Instagram
रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करते. ती करण बुलानीला डेट करत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. रिया आपल्या बोल्ड अंदाजामुळे खूप प्रसिद्ध आहे.
रियाचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. रियाने सोनमसोबत आपला रेसन क्लोथिंग ब्रँड लाँच केला होता.