हिना चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आता करते हे काम, जाणून व्हाल थक्क

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले ज्यांनी हिट चित्रपटांतून आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु काही चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी कलाविश्वाला रामराम ठोकले. आज आम्ही तुम्हाला एका अशाच पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीला चित्रपटसृष्टीत राज कपूर यांनी आणले होते.

या अभिनेत्रींचे नाव जेबा बख्तियार असे आहे. जेबा एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. जेबा खूप सुंदर होती. तिचा जन्म ५ नोव्हेंबर १९६५ रोजी  पाकिस्तानमध्ये झाला होता. तिचे खरे नाव शहीन असे होते. तिने तिचे संपूर्ण शिक्षण लाहोर आणि कतार येथे पूर्ण केले.

शिक्षणानंतर तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. प्रथम छोट्या पडद्यावरून तिने सुरुवात केली होती. अनारकलीमधील जेबाच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले होते.

१९९१ मधील हिना या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जेबा खूप सुंदर असल्यामुळे तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ होत असत. पहिल्याच चित्रपटातून ती खूप प्रसिद्ध झाली होती. परंतु नंतर तीअचानक कुठे गायब झाली आणि ती सध्या काय करते असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात.

हिना चित्रपटानंतर तिने काहीच चित्रपटात काम केले परंतु ते चित्रपट काही गाजले नाहीत. चित्रपट मिळत नसल्यामुळे चाहते जेबाला विसरू लागला. हळू हळू तिला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. बॉलिवूड करिअर संपल्यावर जेबा परत पाकिस्तानात गेली.

यांनतर तिने सेटल होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार तिने चार लग्न केली आहेत. आता ती पाकिस्तानमध्ये डेली सोपं डायरेक्ट करत आहे.

Leave a Comment