सलमान खान आणि विराट कोहली यांच्या मध्ये सर्वाधिक संपत्ती कोणाची? जाणून घेण्यासाठी लगेच वाचा!

भारतीय अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटपटू विराट कोहली हे दोघेही आपापल्या क्षेत्रात स्टार आहेत. सलमान खानने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तर विराट कोहलीने दमदार फलंदाजीने मैदानावरील प्रेक्षकांची मने जिंकली. हे दोघेही खूप कमाई करतात.

सलमान त्याच्या केवळ एका चित्रपटामधून देखील करोडोची कमाई करतो. तो जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी देखील करोडो रुपये मानधन घेतो. विराट कोहलीची बीसीसीआय, आयपीएल आणि जाहिरातींमधून करोडो रुपयांची कमाई होते. विराट भारतीय क्रिकेटपटूंमधील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि लोकप्रिय क्रिकेटर आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात की सलमान खान आणि विराट कोहली यांच्यापैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे.

विराट कोहलीची संपत्ती-

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव जगभरातील श्रीमंत क्रिकेटरच्या यादीत आहे. तो खूप चर्चेत असतो. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्याच्याकडे ३९० कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. त्याचे मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन आलिशान बंगले आहेत. तो अनेक जाहिरातींमधून पैसे कमवितो. यात हेड अँड शोल्डर, पेप्सी, बूस्ट, फास्टट्रॅक आणि जिओनी यांसारख्या ब्रॅण्डच्या जाहिरातींचा समावेश होतो. या जाहिरातींसाठी तो करोडोंचे मानधन घेतो.

सध्या विराट कोहलीकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडील गाड्यांची किंमत जवळपास दहा करोड रुपये इतकी आहे. विराटने जवळपास १८ करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याला बीसीसीआय कडून ७ करोड पगार मिळतो. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीला दरवर्षी तब्बल १७ करोड मिळतात.

सलमान खानची संपत्ती-

भाईजान नावाने प्रसिद्ध असणारा अभिनेता म्हणजेच सुपरस्टार सलमान खान. सलमान खान चित्रपटांच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. याशिवाय चित्रपट प्रदर्शित झाल्यावर होणाऱ्या नफ्यापैकी काही टक्के हिस्सा देखील सलमान खानला दिला जातो. सलमान खान रिऍलिटी शो बिग बॉस साठीच्या सूत्रसंचालनासाठी देखील करोडो रुपये मानधन घेतो.

त्याचे नोएडा, चंदिगढ, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये आलिशान मोठी घरे आहेत. मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या सलमान खानच्या घराची किंमत तब्बल ११४ करोड रुपये असल्याचे बोलले जाते. त्याची एकूण संपत्ती १८०० करोडपेक्षा खूप जास्त आहे.

Leave a Comment