मुंबईच्या चाळीत जन्मलेला ‘हा’ गोंडस मुलगा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार; नाव ऐकून व्हाल थक्क…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. उत्तम अभिनयाने त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले. पडद्यावर साकारलेले पात्र तो खऱ्या आयुष्यात देखील जगतो. तो मुंबईतील निवासी आहे.

विक्कीचे वडील बॉलिवूडमधील स्टंटमॅन आहेत. त्यांनी एक्शन डायरक्टरचे देखील काम केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचे नाव घेतले जात आहे. चित्रपटांबद्दल त्याला लहानपणापासूनच इंटरेस्ट होता. अभ्यास आणि क्रिकेटमध्ये त्याला विशेष आवड होती. त्याने इंजिनिअरिंग केले आहे. इलेक्ट्रॉनक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण त्याचे झाले आहे.

त्याने मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. त्याने किशोर नमित कपूर अकादमीमधून अभिनयाचे शिक्षण घेतले.

विक्की अनेकवेळा आपल्या वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर जात असे. त्याने अनुराग कश्यप यांचा गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटांमध्ये असिस्टेंट म्हणून काम केले. या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक नीरज घयावन होते.

नीरज यांच्या आगामी चित्रपट मसान साठी त्यांनी विक्की कौशलला ऑडिशन साठी बोलावले होते. उत्तम अभिनयामुळे नीरज यांनी विक्कीला या चित्रपटात नायकची भूमिका दिली. मसान या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट डेब्यू चा IIFA अवॉर्ड मिळाला.

यानंतर विक्कीने अनेक हिट चित्रपट दिले. राघव २.०, राजी , संजू या सुपरहिट चित्रपटांमुळे विक्कीला खूप लोकप्रियता मिळाली. २०१९ मधील उरी: द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. उरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटींची कमाई केली.

विक्की खवय्या आहे आणि त्याला फिरायला खूप आवडते. तो चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ३ करोड इतके मानधन घेतो. नवाजुद्दीन सिद्दीकी हे विक्कीचे आवडते अभिनेते आहेत. हरलीन सेठी आणि विक्की बराच काळ एकमेकांना डेट करत होते. काही काळानंतर ते वेगळे झाले. विक्कीने कतरीना कैफसोबत लग्नगाठ बांधली. विक्की सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment