जुदाई चित्रपटामधील हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार; नाव ऐकून व्हाल थक्क

अनेक बाल कलाकार लहान वयातच कॅमेऱ्याला सामोरे जातात. एका अनुभवी कलाकाराप्रमाणे ते देखील आपली भूमिका अगदी उत्तमरीत्या बजावतात. सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार आणि मुख्य कलाकार म्हणून चित्रपट दुनियेत यशाचे शिखर गाठले. त्यांच्याप्रमाणे असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.आज आम्ही तुम्हाला अशाच एका बालकलाकाराची ओळख करून देणार आहोत. ज्याने जुदाई या अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. जो आज एक नावाजलेला अभिनेता म्हणून बॉलिवूड मध्ये आपले नाव कमावत आहे.

हा आहे जुदाई चित्रपटातील बालकलाकार-

जुदाई चित्रपटातील बालकलाकाराचे नाव ओमकार कपूर असे आहे. आज असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांना आपण मोठे झाल्यावर चित्रपटात पाहतो तर ओळखू शकत नाही. ओमकार आज एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख बनवली आहे. तरी देखील तुम्ही त्याला ओळखू शकत नाहीत. खूप कमी लोक आहेत ज्यांनी त्याला ओळखले. त्याची बालकलाकार म्हणून ऍक्टिंग पाहून सर्व दंग राहिले.

ओंकार खूप हँडसम आहे. जुदाई या चित्रपटात त्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केली होती. हा चित्रपट १९९७ साली रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

त्याचा बालकलाकार म्हणून गाजलेला चित्रपट मासूम हा मराठीतील माझा छकुला या चित्रपटाचा हिंदीतील रिमेक होता. यातील छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. हे गाणं त्यावेळी प्रत्येक लहान मुलाच्या ओठी रेंगाळायचे. त्याचे मासुममधील बालकलाकाराच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले.

अभिनेता सलमान खानच्या जुडवा या चित्रपटामध्ये त्याने सलमानच्या लहानपणाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्याने चाहत, हिरो नं १, इंटरनॅशनल खिलाडी ,मेला अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका अगदी उत्तमरीत्या बजावली होती.

प्यार का पंचनामा २ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत कमबॅक केले आहे. यामध्ये त्याने तरुण ही भूमिका साकारली होती. यातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले. तरुणाईने या चित्रपटाला खूप पसंती दर्शवली. या चित्रपटामध्ये अभिषेक कपूर सोबत कार्तिक आर्यन, नुसरत बरूचा यांनी अभिनय केला होता. हा चित्रपट खास करून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांचावर आधारित होता. त्यामुळे तो तरुणाईला प्रचंड आवडला. त्यानंतर ओमकारने जुटा कहीं का आणि U me aur Ghar या चित्रपटांमध्ये काम केले होते.

ओमकारने १३ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. ओमकार एक मेहनती आणि टॅलेंटेड अभिनेता आहे. त्याने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

Leave a Comment