बॉलिवूड स्टार अक्षय कुमारपेक्षा त्याच्या बहिणीचीच जास्त चर्चा, कोट्यवधी रुपयांची आहे मालकीण…

बॉलिवूडमधील खिलाडी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया असे आहे. परंतु बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताना त्याने राजीव भाटियावरून अक्षय कुमार असे नाव करून घेतले. अक्षयची खूप चर्चा चालू असते.

मग ती त्याच्या फिल्मी लाईफबद्दल असो किंवा पर्सनल लाईफबद्दल. परंतु आज आम्ही तुम्हाला त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीविषयी सांगणार आहोत. जिच्याविषयी कोणाला फारसं माहित नाही. या व्यक्तीचे नाव आहे अलका भाटिया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अलका भाटिया नक्की आहे तरी कोण? तर ही अलका भाटिया म्हणजे अक्षय कुमारची बहीण. तर आज आपण तिच्याविषयी जाणून घेऊयात.

अक्षय आणि अलका हे दोघे बहीण भाऊ असून ते अमृतसर येथे जन्माला आले आहेत. अक्षय कुमारच्या आईचे नाव अरुणा भाटिया असे आहे, तर वडील हरिओम भाटिया एक मिलिटरी ऑफिसर आहेत.

अक्षय कुमार सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची संपत्ती करोडोंमध्ये आहे. तो अभिनेत्याशिवाय एक बिझनेसमन देखील आहे. एका सिनेमासाठी अक्षय कुमार जवळपास ६० करोड रुपये घेतो. वर्षभरात तो साधारणपणे ५ ते ६ सिनेमे करतो.

अक्षयची छोटी बहीण अलका करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. ती अक्षयपेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रीमंत आहे. ती ना कोणता बिझनेस करते ना कोणते काम तरी देखील ती कोट्यवधी कशी असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. २३ डिसेंबर २०१२ मध्ये अक्षयची बहीण अलका भाटिया हिचे लग्न सुरेंद्र हिरानंदानी सोबत झाले. अलका चर्चेत येण्याचं मोठं कारण म्हणजे तिची संपत्ती.

अलका चर्चेत येण्यामागे काही  महत्वाची करणे आहेत. मुख्य म्हणजे तिचे वय, तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा असलेला नवरा, तिचे दुसरे लग्न आणि शेवटचे कारण म्हणजे भारतातील टॉप १०० जणांच्या यादीमध्ये नाव असलेले तिचे पती सुरेंद्र हिरानंदानी. वयाच्या ४० व्या वर्षी तिने दुसरे लग्न केले. तिचा हा निर्णय कशाला काही फारसा पटला नव्हता.

याचे कारण म्हणजे तिला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती आणि दुसरा पती हा तिच्यापेक्षा चक्क १५ वर्षांनी मोठा तसेच विवाहित होता. अलकाने लाईफ पार्टनर म्हणून ज्या व्यक्तीची निवड केली होती ते सुरेंद्र भारताच्या सर्वात १०० श्रीमंतांच्या यादीत येतात.

अक्षय कुमारला जेव्हा समजले कि त्याची बहीण ४० व्या वर्षी दुसरे लग्न करत आहे आणि तिने पसंत केलेला व्यक्ती हा तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा आहे हे पाहून अक्षय या नात्याबद्दल जरा सुद्धा खुश नव्हता. अलकाला पहिल्या पतीपासून अगोदरच एक मुलगी होती. एवढेच नाही तर सुरेंद्र यांच्या मुलीचे वय देखील लग्नाच्या वयाचे झाले होते हे सुद्धा अक्षय कुमारच्या नाराजीच्या मागचे कारण होते.

सुरेंद्र हिरानंदानी यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुली होत्या. अलकासोबत लग्न करण्यासाठी ते  आपल्या ३० वर्षांच्या सुखी संसारातून विभक्त झाले. २०११ मध्ये त्यांनी पहिली पत्नी प्रीतीला सोडले. बहिणीच्या हट्टापुढे अक्षयला नमते घ्यावे लागले. त्याने हे नाते स्वीकारले. भारताच्या अनेक मोठा शहरात हिरानंदानी यांचे मोठं मोठे टॉवर्स आहेत.

हिरानंदानी हॉस्पिटल्स, हिरानंदानी शाळा, एवढेच नाही तर हिरानंदानी स्वतः हाऊस ऑफ हिरानंदानी चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. हाऊस ऑफ हिरानंदानी एक टॉप बिजनेस ग्रुप आहे. जी भारतामध्ये हाऊसिंग आणि रिअल इस्टेटच्या सेक्टरमध्ये काम करतो.

अलका भाटिया एक चित्रपट निर्माती आहे. तिने फगली या चित्रपटाची निर्माती केली आहे. अलका आणि सुरेंद्र आपला सुखी संसारात व्यस्त आहेत. लग्नानंतर देखील अक्षय कुमार आणि त्याची बहीण एकाच इमारतीमध्ये वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. जी व्यक्ती भारताच्या १०० श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल तर तुम्ही अंदाज लावूच शकता की त्यांची संपत्ती किती असेल.

Leave a Comment