एकेकाळी 96 किलो वजनाची होती सारा; फिट राहण्यासाठी घेते असा आहार…

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली एक ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खानने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सध्या ती एक आघाडीची अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

परंतु आता बोल्ड आणि हॉट दिसणारी सारा एकेकाळी तिच्या लठ्ठपणामुळे त्रस्त होती यावर तुमचा विश्वास बसेल का? हो, हे खरं आहे.

सारा एकेकाळी तब्बल ९६ किलोंची होती. ती या लठ्ठपणाला खूप त्रासली होती. तिने यावर मात करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज तिच्या सौंदर्याकडे पाहून तिच्या मेहनतीचे सार्थक झाले असे वाटते.

आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेसची फार काळजी घेतात.

प्रत्येकाचे आपले फिटनेसच्या बाबतीत वेगवेगळे सिक्रेट्स आहेत. अलीकडेच अभिनेता वरून धवनने सारा अली खानचे फिटनेस गुपित शेअर केले आहे. इंस्टाग्रामवर साराच्या जेवणाचे फोटो शेअर करून त्याने सांगितले आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये खूप कमी अन्न आहे. एक भाजी, छोटा ब्रेड, आणि काकडीचे तीन काप असा आहार आहे.

या फोटोला वरुणने लंच असे कॅप्शन दिले आहे. खास म्हणजे सारा तिच्या फिटनेस बाबतीत खूप सतर्क असते. ती रोज जिमला जाते. याअगोदर देखील साराने तिच्या जिममधील वर्काउटचे फोटो शेअर केले होते.

साराला कॉलेजच्या काळात पीसीओडी होता, ज्यामुळे तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढलं होत. परंतु साराने बॉलिवूडमध्ये पाय टाकताच ती सतत जिमला जाऊ लागली, संतुलित आहार खाऊ लागली.

आज तिचे रूप पाहून चाहते घायाळ होतात. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. एक युथ आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिलं जात.

सारा आणि वरून त्यांच्या आगामी कुली नंबर १ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. साराने केदारनाथ या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका बजावली होती.

यातील तिच्या अभिनयाचे साऱ्यांनीच कौतुक केले. तर तुम्ही देखील लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर काळजी करू नका. जिममध्ये जा, आहारात बदल करा. मग बघा साराप्रमाणे तुम्ही देखील कसे फिट होताल.

Leave a Comment