बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांची मुलगी, करत आहे ‘हे’ काम! जाणून व्हाल थक्क…

बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी  यांना प्रत्येकजण ओळखतो. मोगेम्बो या नावाने ते प्रसिद्ध झाले होते. आज जरी ते हयात नसले तरी देखील त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

अमरीश पुरी यांना चित्रपटामध्ये हिरो बनण्याची इच्छा होती. परंतु, बहुदा त्यांच्या ते नशिबात नव्हते. त्यांनी अनेक निगेटिव्ह भूमिका केल्या. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे खलनायक बनले. दुर्देवाने, ते आपल्यात नाहीयेत परंतु त्यांचे चित्रपट अजूनही ते हयात असल्याची आठवण करून देतात. आज आम्ही तुम्हाला त्यांची मुलगी नम्रता पुरी बद्दल सांगणार आहोत.

नम्रता पुरी नेहमीच अभिनय क्षेत्रापासून दूर असते.  ती एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिला अभिनय क्षेत्रात अजिबात रस नाही.

तिचे सॉफ्टवेअर अभियंताचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ती कॉस्चुम डिझायनर देखील आहे. तिला राजीव पुरी नावाचा एक भाऊ आहे. नम्रता विवाहित असून तिला एक मुलगी आहे.

नम्रता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत.

अमरीश पुरी यांनी अनेक हिट चित्रपट दिले. मिस्टर इंडिया या चित्रपटातील मोगेम्बोने तर सर्वांनाच भुरळ घातली. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये विलेनची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment