राजा हिंदुस्थानी मध्ये किस करताना थरथर कापत होती करिष्मा कपूर, म्हणाली “तीन दिवसांपर्यंत मी…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूरने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने तिच्या कमालीच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे राजा हिंदुस्थानी. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत दिसून आला.

यात करिष्मा एका श्रीमंत बापाच्या मुलीच्या भूमिकेमध्ये दिसली तर आमिर खान एका टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसला.

हा चित्रपट खूपच गाजला होता. यातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले. या चित्रपटातील गाणी देखील अजूनही लोकांच्या ओठी रेंगाळतात.

राजा हिंदुस्थानी या चित्रपटामधील आमिर खान आणि करिष्मा कपूर यांच्यातील चित्रित करण्यात आलेला किसिंग सीन अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला होता.

एका मुलाखतीत करिश्माने या चित्रपटाविषयी काही विशेष गोष्टींचा खुलासा केला होता. यावेळी करिश्माने त्या किसिंग सीनबद्दल जे काही सांगितले होते ते बरेच दिवस चर्चेचा विषय बनला होता.

करिष्मा कपूरने सांगितले की, या किसिंगला चित्रित करण्यासाठी पूर्ण तीन दिवस लागले होते. यावेळी करिष्मा अक्षरशः थरथर कापत या गोष्टीचा विचार करत होती की, हा किसिंग सीन कधी संपेल आणि ती या सीनचे चित्रीकरण संपायचे वाट पहायची.

हा सीन संध्याकाळी ६ वाजता शूट केला होता त्यामुळे तिथे खूप थंडी होती, ज्यामुळे इट थरथर कापायची.

राजा हिंदुस्थानी हा गाजलेला चित्रपट १९९६ मध्ये १५नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

या चित्रपटातील अन्य कलाकारांचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील प्रत्येक गाणी अजून ताजी असल्यासारखी वाटतात.

Leave a Comment