कूछ कुछ होता है मधील छोटी अंजली आता झाली आहे खूप मोठी आणि सुंदर, फोटो बघून व्हाल थक्क…

१९१८ मध्ये प्रदर्शित झालेला कुछ कुछ होता है या चित्रपटाला आता २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, काजोल, आणि राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत होते. याचे दिग्दर्शन कारण जोहरने केले होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

या हिट चित्रपटाला अनेक अ‍ॅवॉर्ड मिळाले. शाहरूख खानला या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टर आणि काजोलला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. सोबतच सलमान खान आणि राणी मुखर्जीला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. या चित्रपटामध्ये तुम्हाला शाहरुख खान आणि राणी मुखर्जीची मुलगी अंजलीची भूमिका साकारणारी बालकलाकार आठवत असेल ना.

या चित्रपटात ज्या अभिनेत्रीने अंजलीची भूमिका साकारली होती तिचे नाव सना सईद असे आहे. ती आता २० वर्षानंतर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा जन्म १० ऑक्टोबर १९८८ साली झाला होता. जेव्हा तिने अंजलीची भूमिका साकारली तेव्हा ती अवघी १० वर्षांची होती. सना आता जवळपास ३० वर्षांची झाली आहे. तर चला पाहुयात सना आता कशी दिसते आणि ती सध्या काय करते?

सना सईद सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो , व्हिडिओ शेअर करत असते. हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटामध्ये देखील तिने बालकलाकाराचे काम केले होते.

करण जोहर दिग्दर्शित स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटामध्ये देखील तिने भूमिका साकारली आहे. २००८ मध्ये आलेल्या सिरीयल लो हो गई पूजा इस घर की यामध्ये देखील तिला पाहायला मिळाले. सना नोटबंदीच्या काळामध्ये खूप चर्चेत आली होती. तिने एक धक्कादायक खुलासा केला होता ती म्हणाली, दिग्दर्शक विशाल पांड्याकडून ५०० रुपये उधार घेऊन ५ दिवस घालवावे लागले होते.

सनाने अनेक रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला. झलक दिखला जा, खतरों के खिलाडी, नच बलिए यामध्ये तिने भाग घेतला होता.

Leave a Comment