मराठमोळी अभिनेत्री पूर्वा गोखलेची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून व्हाल थक्क…

मराठी अभिनेत्री पूर्वा गोखले हिने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. तिने बऱ्याच मालिकांमध्ये कामे केली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी सारख्या गाजलेल्या मराठी मालिकेत तिने तिची भूमिका अगदी उत्तमरीत्या साकारली आहे. कुलवधू  या मराठी मालिकेत तिने काम केले आहे. नंतर तिने तिच्या अभिनयाचे जहाज हिंदी मालिकांकडे वळवले. कहाणी घर घर की, कोई दिल मैं है, तुझसे है राबता अशा हिंदी मालिकांमध्ये तीने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

तुझसे है राबता या मालिकेमध्ये तिने अनुप्रिया देशमुखची व्यक्तिरेखा साकारली होती. यातील तिच्या अभिनयाने हिंदी सृष्टीत तिला खूप प्रसिद्धी मिळाली. तब्बल १३ वर्षानंतर भयभीत चित्रपटाच्या माध्यमातून ती सुबोध भावे सोबत पुन्हा एकदा झळकली होती. स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेमध्ये तिने महाराणी सईबाईंची भूमिका साकारली होती. कुलवधू या मालिकेत पूर्वाने देवयानीची भूमिका साकारली होती. यानंतर तिने केदार गोखले सोबत लग्नगाठ बांधली. केदार हा एक बिझनेसमॅन आहे. अनुष्का आणि काशवी अशा त्यांच्या दोन मुली आहेत.

पूर्व गोखले ही ज्येष्ठ अभिनेत्री कांचन गुप्ते यांची मुलगी आहे. घरातूनच अभिनयाचा वारसा असल्यामुळे पूर्वाने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. कांचन गुप्ते यांनी नोकरी सांभाळून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी बऱ्याच मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये कामे केली आहेत. घाडगे अँड सून, माझ्या नवऱ्याची बायको, जावई विकत घेणे आहे अशा मालिकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये कांचन गुप्ते यांनी महाजनी काकूंची भूमिका साकारली होती. कांचन गुप्ते यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले.आईच्या पावलावर पाऊल टाकत पूर्वा देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाली. पूर्वाने हिंदी सृष्टीतदेखील स्वतःच्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. या दोघी मायलेकींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

Leave a Comment