‘लायगर’चा ट्रेलरने चाहत्यांना लावलं याड, अभिनेत्याला कुणी घातला दुधाने अभिषेक; तर कुणी बनवला टॅटू

जगभरात सिनेमाप्रेमींची कमी नाही. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. कधीकधी त्यांचं प्रेम पाहून चाहते आणि कलाकारांचं नातं जणू देव आणि भक्ताचंच आहे, अशी अनुभूती होते. असंच काहीसं दृश्य, ‘लायगर‘ सिनेमाच्या ट्रेलर लाँच दरम्यान पाहायला मिळालं. या सिनेमाची चाहत्यांना इतकी उत्सुकता आहे की, त्यांनी अभिनेता विजय देवरकोंडा याच्या पोस्टर्सवर प्रेमाची जोरदार बरसात केली आहे. कोणी या पोस्टर्सवर दूधचा अभिषेक, तर कुणी फुलांची बरसात केली. एवढंच नाही, तर लोक मोठ्या संख्येने नाचताना देखील दिसले. अशाच चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

विजय देवरकोंडावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
गुरुवारी (दि. २१ जुलै) हैदराबादच्या सुदर्शन थिएटर येथे एकदम हटके अंदाजात विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. आपल्या आवडत्या कलाकारावर चाहत्यांनी प्रेमाची अशी बरसात केली, हे पाहून विजय देवरकोंडा त्याच्या चाहत्यांसाठी तो फक्त एक कलाकार नसून त्यापेक्षा खूप जास्त असल्याचे लक्षात येत आहे.

‘लायगर’ (Liger) सिनेमाच्या ट्रेलर रिलीज दरम्यान चाहते जबरदस्त अंदाजात जल्लोष करताना दिसले. दक्षिण भारतातील बऱ्याच फॅन क्लबच्या ट्विटर अकाऊंटवर याची झलक आपण पाहू शकतो. विजय देवरकोंडाच्या पोस्टर्सला, खूप मोठ्या फुलाच्या माळांनी सजवण्यात आले होते. महिला आणि पुरुष सगळेच नृत्य करताना दिसत आहेत. हा नजारा अगदी तसाच होता, जसा सणाच्या दिवशी असतो.

एवढंच नाही, तर बरेच चाहते शर्टलेस होऊन तशाच अंदाजात दिसले, जसे ‘लायगर’मधील विजय देवरकोंडाचा अंदाज आहे. एखादा कलाकार चाहत्यांना किती वेड लाऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे, देवरकोंडाच्या काही चाहत्यांनी आपल्या शरीरावर लायगरचा टॅटू बनवला आहे. दक्षिण सिनेजगतातील मोठे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannadh) यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘लायगर’ या सिनेमामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही देखील दिसणार आहे. हा सिनेमा हिंदी सोबतच इतर चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Leave a Comment