शेखरच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “पाच वर्षे या गोष्टीची वाट पाहिली

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ यातील संजना हिची भूमिका हि प्रेक्षकांना खूप आवडते. रुपाली भोसलेने संजनाची भूमिका साकारली आहे.

संजना मालिकेत भुमीका साकारते तयाप्रमाणे तिला तिच्या व्ययक्तिक आयुष्यात देखील संकटाना तोंड द्यावे लागत आहे.

तिचा पहिला एक घटस्फोट झाला आहे. तिच्या पहिल्या पतीचे नाव मिलिंद शिंदे हे होते. लग्नानंतर ती परदेशात राहायला गेली होती.

मात्र, लग्नाच्या काही दिवसांमध्ये पतीने तिला भरपूर त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती भारतात पळून आली. त्यानंतर तिने छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

खूपच कमी वेळेत रुपाली भोसलेने मालिका विश्वामध्ये स्थान मिळवले. खऱ्या अर्थाने रुपाली भोसलेला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे वेगळी ओळखनिर्माण झाली आहे.

आता मालिकेमध्ये रुपाली भोसलेच्या घटस्फोटीत पतीच्या भूमिकेत शेखर ही भूमिका चांगलीच प्रेक्षकांना आवडली आहे. शेखर ही भूमिका मराठमोळा अभिनेता मयूर खांडगेने साकारली आहे.

मयूर खांडगेने  देखील एक चोखंदळ अभिनेता आहे. अनेक चित्रपट, जाहिरातीच्या माध्यमातून मयूर खांडगेने आपली ओळख निर्माण केली आहे.

मात्र, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून मयूर खांडगेने आपली वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. अभिनेता मयूर खांडगेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांशी नेहमी संपर्कात असतो.

या माध्यमातून तो त्याचे उपक्रम, नवीन फोटो आणि सध्या मयूर खांडगे च्या मनामध्ये काय विचार चालू आहेत, याबाबत माहिती देत असतो आणि प्रेषक देखील त्याच्या या पोस्टला खूप लाईक करत असतात.

आता आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मयूर खांडगे याची भूमिका एक वेगळ्या टप्यावर आली आहे. संजना ही कशी स्वार्थी बाई आहे, हे मयूर खांडगे पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत आहे.

अनिरुद्ध तिला अनेकदा आणखी पाठीशी घालताना दिसत आहे. संजनामुळे कुणाचे नुकसान होऊ नये, असा त्याचा प्रामाणिक हेतू आहे.

आता या मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे हे आतच सांगणे कठीण आहे. मयूर खांडगे याने नुकतीच सोशल मीडिया एक पोस्ट केली आहे.

https://www.instagram.com/p/Cfqxfp0pDx8/?hl=en

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या मयूर याने नव्या सिनेमाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्याचा नवीन एक सिनेमा येणार असून त्या सिनेमाचे नाव ‘हबड्डी’ हे आहे.

या चित्रपटाच्या  प्रदर्शनासाठी त्याने पाच वर्ष वाट पाहिली. मयूर याने पोस्ट लिहून कॅप्शन मध्ये सांगितले की नचिकेत सामंत दिग्दर्शित हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे त्यांच्या या पोस्टनंतर आता एकच चर्चा सुरू झाली आहे.

मयूर याने हायवे, देऊळ, सायकल, घंटा, हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, त्याला खरी ओळख शेखरच्या भूमिकेतून मिळाली. तर तुम्हाला मयूर खांडगे साकारत असलेली शेखर ही भूमिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Leave a Comment