१९८२ सालच्या व्हीक्स जाहिरातीमधील ‘हि’ मुलगी आठावते का? आज आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री…

१९८२ साली व्हिक्स कफ ड्रॉप्सची एक जाहिरात दूरदर्शनवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होती, तसेच ही जहिरात त्याकाळाकामध्ये सर्वांना आवडली होती, परंतु तुम्हाला माहित आहे का? या जाहिरातीमध्ये दिसणारी चुमुकली आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. व्हिक्सच्या जाहिरातीमध्ये दिसणार्य लहान मुलीचे नाव इशिता अरुण असं आहे, इशिता अवघी ३ वर्षांची असताना तिने या जाहिरातींमध्ये काम केलं होत, तसेच इशिता शाळेमध्ये शिकत असताना तिने नादिरा बब्बर यांच्या अभिनय वर्कशॉपमधून अभिनयाचे धडे गिरवले होते.

अभिनेत्री इशिता अरुणने सें. क्झेविअर्स या कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, तसेच इशिताने श्याम बेनेगल यांच्या ‘यात्रा’ या मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. इशिता अरुण ही  बॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री आणि गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईला अरुण यांची मुलगी आहे.

तसेच गायिका वैशाली सामंत यांच २००२ मधलं ‘ऐका दाजीबा’ हे गाणं चांगलंच हिट झालं होत, या गाण्यामध्ये अभिनेता मिलिंद गुणाजी आणि अभिनेत्री इशिता अरुण हे कलाकार झळकले होते. या गाण्यामुळे अभिनेत्री इशिता अरुणला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

‘ऐका दाजीबा’ या गाण्यानंतर अभिनेत्री इशिता अरुणला सोनू निगमच्या ‘मौसम’ या अल्बममध्ये सुद्धा दिसली होती. तसेच इशिताने सारेगमप सारख्या रियलिटी शोचे सूत्रसंचालन सुद्धा केलं आहे.

२००५ मध्ये इशिता अरुण आणि ध्रुव घाणेकर यांनी लग्न केलं. ध्रुव घाणेकर हा मराठी चित्रपट दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. तसेच ध्रुव घाणेकर हा बॉलीवूडमध्ये एक गायक आहे आणि या बरोबरच तो शास्त्रीय आणि जॅझ फॉर्म मध्ये सुद्धा स्टेज परफॉर्मन्स करतो.

Leave a Comment