ऐकाव ते नवलंच! साखरपुडा होऊन २० वर्षानंतर लोकप्रिय गायिका जेनिफर लोफेजने केला अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह

लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोफेजने अभिनेता बेन एप्लेकसोबत विवाह केल्याची बातमी समोर आली आहे. ५२ वर्षीय जेनिफर आणि ४९ वर्षीय बेन गेले २० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेतील लास वेगासमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. तत्पुर्वी दोघांच्या नात्यात काहीकाळ दुरावाही आला होता. ब्रेकअपनंतर दोघे मागच्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले होते. आश्चर्य म्हणजे २००२ मध्ये त्यांचा साखरपुडाही पार पडला होता. परंतु वादानंतर त्यांचे हे ठरलेले लग्न मोडले होते.

आपले ठरलेले लग्न मोडल्यानंतर जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांनी आपले मार्ग बदलले. त्यानंतर दोघांनी दुसरा संसारही वसवला  त्यांना मुले झाली. दोघे गेल्या वर्षी पुन्हा भेटले आणि एप्रिलमध्ये पुन्हा लग्न झाले. जेनिफरचा जवळचा मित्र हेअरस्टाइलिस्ट ख्रिस ऍपलटाउनने तिच्या ब्राइडल लूकची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.  ख्रिस ऍपलटाउनने जेनिफर लोपेझचा एक साधा पांढरा वेडिंग गाऊन फिरतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत “लग्नाच्या आधीच्या शेवटच्या क्षणाच्या भावना…” असा गोड कॅप्शन दिला आहे. व्हिडिओमध्ये, ख्रिस जेनिफरला तिला कसे वाटते हे विचारल्यानंतर तिने ” मला आश्चर्यकारक वाटत आहे, असे उत्तर दिल्याचे ऐकू येत आहे.

ड्रेसबद्दल बोलताना जेनिफर लोपेझ म्हणते, “मी ते सेव्ह करत आहे, सेव्ह करत आहे, सेव्ह करत आहे आणि आता मी माझ्या लग्नाच्या दिवशी तो परिधान करत आहे.” पीपल मॅगझिननुसार, जेनिफर आणि बेन यांनी एका वृत्तपत्रात त्यांच्या लग्नाची घोषणा केली, त्यानुसार या जोडप्याला नेवाडामध्ये लग्नाचा परवाना मिळाला आणि शनिवारी उशिरा दोघांनी एका चॅपलमध्ये लग्न केले. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Leave a Comment